मुंबई : नव्वदच्या दशकात प्रेक्षकांचे हृदय चोरणारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम खान (Actress Sonam Khan) आता ओटीटीवर धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, गोविंदा, संजय दत्त आणि चंकी पांडे यांसारख्या ख्यातनाम अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. एक नव्हे तर तीन चित्रपटांमध्ये दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या विरोधात तिने अनोखी भूमिका साकारली तसेच प्रोसेनजीत चॅटर्जी आणि चिरंजीवी सारख्या सुपरस्टार अभिनेत्यासोबतही तिने काम करून नव्वदीच्या काळात आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली.
आजही लाईम लाईट मध्ये राहून या जबरदस्त अभिनेत्रीने इतकी वर्षे तिचे आकर्षण कायम ठेवले आहे. ती आता पुन्हा कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी आणि इंडस्ट्रीत आपल्या कामाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ओटीटी हे काही मनोरंजनाचा नवीन माध्यम बनल्यामुळे ही अभिनेत्री म्हणते, “प्रत्येक अभिनेता OTT वर एक नायक आहे कारण OTT प्लॅटफॉर्मवर असलेला कंटेंट खूप समृद्ध आहे. मी मिर्झापूर आणि जामतारा यांची खूप मोठी चाहती झाली. मी त्यांना बिनधास्तपणे पाहिलं आहे. मला एखादा ओटीटी शो आला तर मी नक्कीच हो म्हणेन.”
सोनम ९०च्या दशकातील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग झाली. ज्यात अजूबा, त्रिदेव आणि विश्वात्मा यांचा समावेश आहे. सोनमचे चाहते तिला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra