Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजTu Jhuthi Main Makkar : सोनी मॅक्सवर रविवारी ‘तू झुठी मैं मक्कार’...

Tu Jhuthi Main Makkar : सोनी मॅक्सवर रविवारी ‘तू झुठी मैं मक्कार’…

  • ऐकलंत का! : दीपक परब

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला, हा चित्रपट रविवार, २५ जून रोजी रात्री ८ वाजता फक्त सोनी मॅक्सवर वर प्रदर्शित होईल.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर, लव रंजन दिग्दर्शित ‘तू झुठी मैं मक्कार’चा टेलिव्हिजनवर प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट रविवार २५ जून रोजी रात्री ८ वाजता, सोनी मॅक्स या आघाडीच्या हिंदी चित्रपट वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी असून यात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तर कार्तिक आर्यन आणि नुश्रत भरुच्चाही या चित्रपटात मनोरंजन करताना दिसतात.

‘तू झुठी मै मक्कार’ ही एक आधुनिक जोडप्याच्या चिंता आणि विविध अपेक्षांना अधोरेखित करणारी कहाणी आहे. त्याचवेळी ते कौटुंबिक प्रेक्षकांची अपक्षाही हा िचत्रपट पूर्ण करतो व एक उबदार आणि आनंदी अनुभूती देतो. प्रेक्षकांना हसवतो, रोमान्सचा आनंद देतो, भावूक करतो आणि शेवटी काही शिकवण देखील देतो. चित्रपटातील इतर गाण्यांसह ‘ओ बेदर्देया’ हे हार्टब्रेक गाणे प्रेक्षकांच्या मनात विविध भावना जागृत करते. संगीत दिग्दर्शक प्रीतम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि गायक अरिजित सिंग यांनी चित्रपटाच्या संगीतातून आपली जादू पसरवली आहे. भावनांच्या श्रेणीने भरलेल्या, चित्रपटाच्या गाण्यात व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला काहीतरी ऑफर आहे. गाण्यांमध्ये सर्व पिढ्यांसाठी सर्वात संबंधित आणि अविस्मरणीय गीत आहेत!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -