
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिस्टर ३६० म्हणजेच सूर्यकुमार यादवबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापेक्षा २०२३च्या विश्वचषकाशी सूर्यकुमार यादवचा अधिक संबंध आहे. खराब कामगिरीनंतरही सूर्यकुमारने एकदिवसीय संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे. सूर्यकुमारने त्याची खेळी अशीच पुढे सुरू ठेवत टीम इंडियाला विजय मिळवून द्यावेत. त्याच्याकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. सूर्याने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष द्यावे, असा सल्ला बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वाहिनीला दिला.
हा अधिकारी म्हणाला की, सूर्यकुमार हा एक अतिशय सक्षम आणि चाणाक्ष फलंदाज आहे. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, तो ३२ वर्षांचा आहे आणि आपल्याला भविष्यासाठी संघाची योजना आखायची आहे. तिथेच यशस्वी किंवा ऋतुराजसारखे कोणीतरी असे खेळाडू येतात आणि त्याला मागे टाकतात. तो चेंडूचा क्लीन स्ट्रायकर आहे आणि धावांचा वेग सेट करू शकतो. जर तो आपली क्षमता सिद्ध करू शकला, तर ते भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले असेल, असे त्यांनी सांगितले.