
बुलडाणा: छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंग्याचा उदोउदो करणारी अवलाद पुन्हा डोकं वर काढत आहे. बुलडाण्यात असुदुद्दीन ओवेसींच्या (asaduddin Owaisi) भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. सरकारने सत्य तपासून कारवाई करावी आणि दोषींना धडा शिकवावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विटद्वारे केली आहे.
त्यांनी पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हटले, यापूर्वीही वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून आले; पण हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत. आता किमान ओवेसीच्या सभेतील औरंग्याच्या घोषणांचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहेत की बाटगी भूमिका घेणार आहेत?, असा सवाल बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या मातीत औरंग्याचा उदोउदो करणारी अवलाद पुन्हा डोकं वर काढत आहे. बुलडाण्यात असुदुद्दीन ओवेसींच्या भाषणावेळी औरंग्याच्या समर्थनात घोषणा देण्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. सरकारनं सत्य तपासून कारवाई करावी आणि दोषींना धडा शिकवावा.
यापूर्वीही प्रकाशजी आंबेडकर…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 25, 2023
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत औंरंगजेबाच्या नावाची घोषणाबाजी झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, बुलडाणा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाबाबत म्हटले आहे की, या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलिसांकडून केला जाईल. त्यानुसार संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.