Love or Cruelty : प्रेम की क्रूरता?


  • क्राइम : ॲड. रिया करंजकर


टपोरेगिरी करणारी मुलं, शिक्षणात अजिबात रस नसणारी मुलं. चांगल्या शिकलेल्या व कमवत्या मुलींच्या मागे हात धुऊन लागतात व आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात.


वेळ घालवण्याचे साधन म्हणून आज-काल प्रेमाकडे तरुणाई बघत आहे. अंगावरील कपडे बदलावे तसे आज-काल तरुण मुलं-मुली आपले सोबती बदलत आहेत. अभ्यास करिअर याचा विचार न करताही तरुण मुलं प्रेमासारख्या पवित्र शब्दाचा अपमान करत आहेत. नको त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालून नंतर हीच तरुण मंडळी आपल्या नशिबाला दोष देत बसतात.



योगिता ग्रॅज्युएशन झालेली व एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती. पण तिच्या आई-वडिलांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे झोपडपट्टीसारख्या एरियामध्ये ती आपल्या आई-वडील आणि भावासह राहत होती. ती शिकलेली मुलगी म्हणून त्यांच्या एरियामध्ये तिला चांगली मुलगी म्हणून तिला ओळखलं जात होतं.



लॉकडाऊनच्या काळानंतर अनेक लोक बेरोजगार झाले आणि कामधंदा मिळण्यासाठी काही लोक मुंबई शहरांमध्ये आले. सुधीर हा साताऱ्यावरून नोकरीसाठी मुंबईत आलेला मुलगा. मुंबईत नोकरीच्या शोधात तो होता. पण मनासारखी नोकरी त्याला मिळत नव्हती. कारण जेमतेम दहावीपर्यंत सुधीरचे शिक्षण झालेलं होतं. त्याच्यामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती आणि त्याचवेळी त्याला योगिता ही या एरियातली शिकलेली आणि चांगली नोकरीला असलेली मुलगी आहे याची खबर लागली. योगिताला आपल्या जाळ्यात कसं अडकवता येईल, यासाठी तो प्लॅन करू लागला. कामावर येता-जाता योगिताचा पाठलाग करू लागला. योगिताने हे सर्व आपल्या आई-वडिलांना सांगितलं. त्यामुळे त्याची समजूतही तिच्या आई-वडिलांनी घातली. सुधीरने योगिताच्या भावाशी मैत्री केली. मैत्रीमध्ये त्याने योगिताचा नंबर योगिताच्या भावाकडून काढून घेतला आणि योगिताला त्याने दोन-चार वेळा फोनही केले. योगिताने फोनवरूनही त्याला खडसावले. एक दिवस योगिता बाहेर गेली असता सुधीर तिचा पाठलाग करू लागला. त्यावेळी समोर ट्राफिक पोलीस व त्याच्या पलीकडे मुंबई पोलीस असे रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे होते. त्यावेळी योगिताने त्यांना हाक मारण्याचा प्रयत्न केला. सुधीर तिच्याकडे धावत धावत आला आणि स्वतःच्या खिशात लपवून ठेवलेला चाकू त्याने काढला त्यावेळी योगिता घाबरून खाली बसली आणि सुधीरने तिच्यावर दोन वार केले. ट्राफिक पोलीस व मुंबई पोलीस यांनी हे पाहिल्यावर त्याला घटनास्थळावरून पकडण्यात आले.



योगिताला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. सुधीर आता मुलीचा पाठलाग करणे, तिला मानसिक त्रास देणे, तिच्या कुटुंबाला त्रास देणे आणि तिच्यावर चाकू हल्ला करणे, या गुन्ह्याअंतर्गत तो आता जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. योगिताला भीती आहे की तो जेलमधून त्याची शिक्षा पूर्ण करून आल्यानंतर माझं काय, माझ्या कुटुंबाचं काय, ही भीती योगिताच्या मनात आहे.
टपोरेगिरी करणारी मुलं, शिक्षणात अजिबात रस नसणारी मुलं. चांगल्या शिकलेल्या व कमवत्या मुलींच्या मागे हात धुऊन लागतात व आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. जबरदस्तीने धमकावून आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करायला भाग पाडतात. मग हीच मुलं त्या मुलींना त्रास देतात. शेवटी या मुलींना पश्चाताप होऊन कोर्टात जाऊन घटस्फोट घ्यावा लागतो.वडिलांनी योग्य वेळी आपल्या मुलींचे समुपदेशन केलेले फार योग्य आहे.


(सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे