
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा चाहत्यांच्या मनात कायमचा कोरून राहिलेला सुवर्ण क्षण म्हणजे १९८३ साली भारतीय संघाने जिंकलेला विश्वचषक (India's first world cup) होय. या विश्वचषक विजयाला आज ४० वर्षे पूर्ण झाली. २५ जून १९८३ रोजी अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत करत प्रथमच विश्वचषक जिंकला होता.
४० वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय संघाने इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. कर्णधार कपिल देव, उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, यष्टिरक्षक सय्यद किरमानी, रॉजर बिन्नी, मदन लाल, संदीप पाटील, बलविंदर सिंग संधू, कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, सुनील व्हॅल्सन हे दिग्गज क्रिकेटपटू विश्वचषक विजयी संघात होते.
२५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स ग्राउंडवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडिया १८३वर ऑलआऊट झाली. मात्र अप्रतिम गोलंदाजी करत भारताने हा सामना जिंकला होता.