Sunday, August 24, 2025

PM Modi US Visit: मोदींनी चीनला भरला सज्जड दम, असे ठणकावले की...

PM Modi US Visit: मोदींनी चीनला भरला सज्जड दम, असे ठणकावले की...

वॉशिंग्टन डी सी (वृत्तसंस्था): इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, असा इशारा भारताचे पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये  द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर अमेरिकन संसदेतील भाषणात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावलं. तसेच पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताची अनेक वैशिष्ट्ये सांगितली. आमच्याकडे २२ अधिकृत भाषा आहेत, प्रत्येक १०० किमीवर संस्कृती, खाद्य संस्कृती बदलते. मात्र या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही ही विविधता साजरी करतो, असं मोदी म्हणाले.

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिकेच्या रक्तामध्ये लोकशाही आहे. भारतात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर या बैठकीत यु्क्रेन आणि रशियामधील युद्धासंदर्भात चर्चा झाली.

अमेरिका बंगळुरू आणि अहमदाबाद येथे दुतावास सुरू करणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबुत करण्यासाठी अमेरिका बंगळुरू आणि अहमदाबाद येथे दुतावास सुरू करणार आहे. अमेरिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा देश

भारत हा लोकशाहीचा जनक, अमेरिका सर्वात जुनी लोकशाही तर भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. जर ह्यूमन व्हॅल्यूज आणि ह्यूमन राईट नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आम्ही आर्टेमिस करारात सहभागी होण्यास तयार

अमेरिका आणि भारताच्या अंतराळ मोहिमांविषयी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. आम्ही आर्टेमिस करारात सहभागी होण्यास तयार असल्याचे मोदी म्हणाले. ३० वर्षांपूर्वी मी व्हाईट हाऊस बाहेरुन पाहायचो, आज व्हाईट हाऊस अमेरिकेतील भारतीय लोकांसाठी खुलं झालं, असे वक्तव्य व्हाईट हाऊसमधील स्वागतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Comments
Add Comment