आशिष शेलार व संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
पाटण्यात आज विरोधी पक्षांची बैठक
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना खडबडून जाग आली आसून आज अकरा वाजल्यापासून ते बिहारमधील पाटण्यामध्ये (Patna Opposition Meeting) बैठक घेणार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ‘विरोधकांना चिंता मुलाबाळांची’ असं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली. तर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) व भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पाटण्यात आजच्या बैठकीला उपस्थित राहणारे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
विरोधकांच्या बैठकीला लक्ष्य करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणात म्हटलं की माझा सन्मान म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. एकीकडे पंतप्रधान भारताला उंची देण्याचं काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. खरं तर विरोधकांचं त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरु आहे. सोनिया गांधींना राहुल गांधी मुख्यमंत्री हवे आहेत, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना पुढे आणायचंय, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची चिंता आहे, त्यामुळे विरोधकांनी जरी एकत्र मुठी बांधल्या तरी त्यांना मुलाबाळांची चिंता आहे म्हणून ते हे करत आहेत”, अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.
आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर तिखट प्रश्नांची सरबत्ती
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट आव्हान दिलं. औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? औरंगजेब की सावरकर? असे प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केले आणि याच प्रश्नांची होर्डिंग्ज लावून ते उद्धव ठाकरेंना थेट सवाल करणार आहेत असं त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.
महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…
◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?
◆ उस्मानाबाद की धाराशिव?
◆ अहमदनगर की पुण्यश्लोक
अहिल्यानगर?
◆ काँग्रेस की हिंदुत्व?
◆ कबर की स्मारक?
आणि
◆ औरंगजेब की सावरकर?
म्हणून
शब्दांची कोटी न करता..
मर्द,…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 23, 2023
दुसर्याची गद्दारी आणि स्वतःची देशभक्ती : संदीप देशपांडे
ज्या मेहबुबा मुफ्तींनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आयुष्यभर टोमणे मारले, त्याच मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही आज बैठकीसाठी बाजूला बसणार आहात का? असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ दुसर्याने केली तर ती गद्दारी आणि स्वतः केली तर ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय कोणाची असू शकते? स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि दुसर्यांसाठी वेगळे निकष, असा टोलाही त्यांनी लगावला.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra