महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युवकांची मोठी संख्या दिसत आहे. राज्यस्तरावर आज दोन-तीन युवा नेत्यांची नावे घेतली जातात. त्यापैकीच नितेशजी राणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राज्यस्तरावर युवा नेता म्हणून म्हणून स्वकर्तृत्वाने त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यात नितेशजी राणे हे उठून दिसतायत. भारत हा युवावर्गाचा देश आहे ज्याला या परिवर्तनात प्रामुख्याने आपली भूमिका पार पाडायची आहे. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, जे त्यांना जोडून ठेवते आणि त्यांना आवाज प्राप्त करून देते. हा आवाज आता मोठा होऊ लागला आहे. हा संकेत नक्कीच स्वागतार्ह आहे. उत्कृष्ट वक्तृत्व व सोशल मीडियाचा योग्य वापर ही त्यांची जमेची बाजू आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे कसब नितेशजी राणे यांनी आत्मसात केले आहे. याची अनेकदा प्रचिती आली आहे.
प्रसारमाध्यमे समाजाचा महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. प्रसारमाध्यमांकडून केवळ घटनांचा फक्त अहवाल दिला जातो असे नाही, तर ते जनमतही तयार करतात. यामुळे लोकशाहीत माध्यमांना शक्तिशाली स्थान प्राप्त झाले आहे, सोशल मीडियाच्या उदयामुळे प्रसारमाध्यमांचे स्थान आता बरेच बदलले आहे. सोशल मीडियामुळे लोकांना सर्वत्र डोळे व कान लाभले आहेत. ते काही टीव्ही चॅनलच्या कॅमेराकर्मींपुरते मर्यादित नाहीत. सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जे प्रत्यक्ष जनमत अशा प्रकारे दर्शवते की, ज्यात सहज फेरफार करणे कठीण असते. ही सोशल मीडिया समाजाची नाडी प्रतिबिंबित करतात. पारंपरिक मीडिया चॅनेलसुद्धा सोशल मीडियावर लोकांचा कल कोणत्या दिशेला आहे, त्यावर लक्ष ठेवून असतात.
अलीकडील काळात आपण बघतोय की, बऱ्याच मोठ्या बातम्यांचा उगम सोशल मीडियामधून झालेला आहे. समाजाशी जुळलेल्या आणि महत्त्वाच्या समस्यांना चव्हाट्यावर आणण्यासोबतच सोशल मीडियाने शासनाची जनतेशी तुटलेली नाळसुद्धा उघड केली आहे. आपले नेते काय करत आहेत याबद्दल जनता जागरूक झालेली आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे युवकांमध्ये ‘स्टाईल आयकॉन’ म्हणूनही नितेशजी राणे प्रसिद्ध आहेत. नितेशजी राणे हे युवा नेते आहेत. त्याचबरोबर ते टेक्नोसॅव्हीही आहेत. त्यामुळे ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडियावर ते नेहमी सक्रिय असतात. देशातील विविध घडामोडींवर ते भाष्य करत असतात. आजच्या काळात बहुतांश भारतीयांसाठी ‘सोशल मीडिया’ हे शब्द त्यांच्या श्वासाइतकेच महत्त्वाचे बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सोशल मीडियाच्या कोणत्या व्यासपीठावर कोण काय पोस्ट करते आहे, कोणी कोणाविषयी, कशाविषयी काय शेअर केले आहे किंवा अगदी कोणकोणत्या व्यासपीठावरून कधी कोणत्या विषयाच्या संबंधीने लाइव्ह येणार आहे, हे मुद्दे आता आपल्याकडे सर्रास चर्चेला येऊ लागले आहेत. भारतात सोशल मीडियाचा विस्तार अक्षरशः गल्लीपासून दिल्लीपर्यंत, सध्या तर पारावरच्या गप्पांपासून ते संसदेच्या पटलावरील अगदी धीरगंभीर चर्चांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. म्हणजे सध्याचे ताजे संदर्भ विचारात घेतले, तर हा विस्तार अगदी एखाद्या विशिष्ट सोशल मीडिया व्यासपीठाच्या वापराच्या संदर्भाने संसदीय समिती नेमण्यापर्यंतच्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे कसब नितेशजी राणे यांनी आत्मसात केले आहे. याची अनेकदा प्रचिती आली आहे.
नितेशजी राणे यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे स्वाभिमान संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५,०००हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो, या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
नितेशजी राणे यांचे एमबीएपर्यंतचे शिक्षण लंडनमध्ये झाले असून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेशजी राणे भारतात आले. नितेश राणे यांनी थेट राजकारणात उडी मारली नाही. त्यांनी आधी ग्राऊंड लेव्हलला काम करण्यास सुरुवात केली. राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामं केली आणि नंतर राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. आरोग्य समस्या, बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मूलभूत प्रश्न इ. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले. स्वाभिमानच्या माध्यमातून नितेश राणे यांनी २००९-१० पासून पाणीचोरी व पाणीटंचाईविरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरू केले. टँकर माफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री सहाय्यता क्रमांक सुरू केला. पालिका प्रशासन, स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. २०११ मध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज १० लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाइपलाइन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उद्ध्वस्त करण्यात आली.
सप्टेंबर इ. स. २०११ मध्ये मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून नितेश राणे व अनंत पणशीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते. फेब्रुवारी इ. स. २०१२ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व येथे येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरिता नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून ‘सिंधुदुर्ग टूर गाइड’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. नितेशजी राणे यांनी नोकरी एक्स्प्रेस या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली, स्थानिक युवकांना त्यांच्याच गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या/शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यास, महाराष्ट्र या माध्यमातून समृद्ध करता येऊ शकेल, हा उद्देश समोर ठेवण्यात आला. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले. मे २०१४ मध्ये, मराठी कलावंतांना एकत्र येण्याची संधी मिळावी व मराठी कलावंतांमध्ये दडलेल्या खेळाडूला वाव देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गल्लीबोळात लोकप्रिय असलेल्या बाॅक्स क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग (एमबीसीएल) या स्पर्धेची सुरुवात केली.
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नितेशजी राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. कर्तबगार पित्याचा कर्तृत्ववान मुलगा अशी आज आमदार नितेशजी राणे यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आमदार नितेशजी राणे यांनी आज पारंपरिक कामापलीकडे जाऊन त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे. क्रिकेट अकादमी, दोनशे डिजिटल शाळा, इंटरनॅशनल स्कूल, वॅक्स म्युझियम, कचरा निर्मूलन प्रकल्प, कंटेनर थिएटर, कलादालन, वॉटर स्पोर्ट्स, रोपवे, गरीब चाकरमान्यांना फक्त १०० रुपयांत मुंबईतून गणेशोत्सवासाठी प्रवास, गरीब रुग्णांना मदत असे अनेक विकासाचे प्रकल्प व लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी मदत केली आहे. नितेशजी राणे हे नाव आता अखंड महाराष्ट्रात पोहोचले ते त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे.
सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या रुंदावलेल्या कार्यकक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख करून देत आहे. गावा-गावांतील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिक्षणाची सोय आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन लोकांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे ही सामाजिक जाणिवेची गोष्ट आमदार राणेंच्या गावभेटींतून घडू लागली. त्यामुळे नितेश राणे व्यक्ती म्हणून न राहता चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले. लोकांना त्यांचे प्रश्न जाणणारा आणि त्यांच्या प्रश्नांशी निगडित राहून काम करणारा युवा लोकप्रतिनिधी लाभला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेशजी राणे दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असणाऱ्या राणे नितेशजी यांनी ग्रामीण भागात विविध विधायक प्रकल्प मार्गी लावले आहेत. चित्रकार कलावंत आहे व त्याला आर्थिक मदतीची गरज आहे, अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतील गरजूंना त्यांनी स्वतःच्या खिशातून मदत केली आहे. अशी शेकडो उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत.
हा महाराष्ट्र राकट आणि कणखर आहे. पण तेवढाच बकुळ फुलांचा सुगंध, गुलाब फुलांचे सौंदर्य आणि झेंडूच्या फुलांचे मार्दव लाभलेला आहे. नितेशजी राणे यांचे व्यक्तिमत्त्व असेच घडत आहे. उद्याच्या समृद्ध सुसंस्कृत कोकणासाठी एक प्रमुख नेता म्हणून नितेशजी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…