राजकारणाला असलेला कोकणी बाज, विरोधकांना कधी चिमटे काढून, तर कधी थेट ‘प्रहार’ करत सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करणारे महाराष्ट्राचे झुंजार नेतृत्व म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे!
राणे साहेब आणि ज्येष्ठ बंधू माजी खासदार निलेशजी राणे यांच्याप्रमाणेच आक्रमक राजकारण करणाऱ्या आ. नितेशजी राणे यांचा महाराष्ट्रातील राजकारणात स्वतंत्र ठसा आहे, स्वतःच्या अभ्यासू वृत्तीमुळे कमी काळातच नितेश राणे हे नाव महाराष्ट्रात दूरवर पोहोचले आहे. उच्चशिक्षित असलेल्या नितेशजी राणे यांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच त्यांच्या मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. जे वेगळं, जे नवीन ते आपल्या भूमीत असायला हवं, ही इच्छाशक्ती यापूर्वी कोकणवासीयांनी राणे साहेबांमध्ये पाहिली आहे. त्यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर विशेष झळकू लागले. तीच कामाची पद्धत अवलंबत आ. नितेशजी राणे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा कायापालट केला आहे. जनतेच्या स्थानिक गरजांची विशेष दखल घेत त्यांच्या पूर्ततेसाठी ते कटिबद्ध राहिले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात आपल्या पक्षाची सत्ता आहे की नाही ही गोळाबेरीज न करता आवश्यक तिथे आक्रमक भूमिका आ. नितेशजी राणे यांनी घेतली आहे. विरोधकांनी त्यावर कितीही टीका केली तरीही सर्वसामान्यांना मात्र हे आक्रमक नेतृत्व आपलं नि आश्वासक वाटतं, हे नक्की.
सामान्यांचे प्रश्न सोडवतानाच समाज एकसंध ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, याची जाणीव या नेतृत्वाला आहे. समाजात वेगवेगळे मतप्रवाह कधी धर्म, कधी जातीच्या नावाने वावरत असतात. हे प्रवाह जेव्हा समांतर असतात, तेव्हा समाज शांत असतो. पण कोणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला वेळीच आवर घातला पाहिजे ही भूमिका आ. नितेश राणे यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या लव्ह जिहाद प्रकारांना वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यातून अनेक निष्पाप हिंदू युवतींचा बळी जातोय. हे थांबणं गरजेचे आहे, म्हणूनच आ. नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील अनेक ज्ञात-अज्ञात बहिणींच्या मागे मी खंबीर उभा आहे, अशी ग्वाही ते आपल्या कृतीतून देत असतात. आज आ. नितेश राणे यांनी घेतलेल्या या भूमिकेची समाजाला गरज आहे. हिंदू युवतींना टार्गेट करून जाळ्यात अडकवले जात आहे. त्यांना या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठी आ. नितेशजी राणे यांनी घेतलेली भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची आहे.
त्यांच्या अशाच आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे विरोधक अस्वस्थ असतात. अनेकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षे द्यावी लागतात. पण राणे साहेबांच्या मुशीतून तयार झालेल्या, अस्सल कोकणी बाणा अंगी असलेल्या या आश्वासक नेतृत्वाने अल्पवधीतच आपलं वलय तयार केलं आहे.
त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य नेते, पदाधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल एक विश्वास वाटतो आहे. पक्ष आ. नितेश राणे यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपावत आहे, त्यावरूनच भाजपमधील एक आश्वासक नेतृत्व म्हणून जी नावे पुढे येतात, त्यात आ. नितेश राणे हे नाव आघाडीवर आहे, हे स्पष्ट होतं.
आज आ. नितेशजी राणे यांचा वाढदिवस. या दिवशी महाराष्ट्रभरातून विविध माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असेल; परंतु राज्यातील निष्पाप युवतींना लव्ह जिहादसारख्या जाळ्यातून सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल अनेक आई-वडील त्यांना शुभाशीर्वाद देत असतील, यात वाद नाही. विकासाची प्रक्रिया ही केवळ भौतिक पद्धतीने होत नाही, तर सामाजिक विकास होणे आवश्यक असते. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी निभावताना आ. नितेश राणे यांच्याकडे ती व्यापक दृष्टी आहे. राजकारणात कधी चौकार मारायचा, कधी षटकार आणि कधी चेंडू बॅटने खेळवत विजय मिळवायचा हे अचूक जाणणाऱ्या आ. नितेश राणे यांचा राजकीय प्रवास आश्वासक असणार, हे निश्चित आहे. नितेशजी राणे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…