Wednesday, July 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखHindu Dharmarakshak : लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात लढणारा 'हिंदू धर्मरक्षक'

Hindu Dharmarakshak : लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात लढणारा ‘हिंदू धर्मरक्षक’

  • विकास पवार

मागील अडीज वर्षात राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर, लव्ह जिहाद, लँड जिहादच्या घटना घडत होत्या. हिंदूंवरील अत्याचार वाढले होते. मालवणी भागात हिंदुना पलायन करण्यास प्रवृत्त केले गेले. हिंदू साधूंना ठेचून क्रूर पद्धतीने मारण्यात आले. हिंदूंवरील वाढते अत्याचार पाहून हिंदू समाज एकवटला ठिकठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले त्यातील अनेक मोर्चांचे नेतृत्व भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. हिंदूंमध्ये धगधगता अंगार फुलविला. हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या १२ हिंदू मुलींची आतापर्यंत नितेश राणेंनी सुटका केलेली आहे. राजकीय वजाबाकी ची तमा न बाळगता धर्मासाठी लढणाऱ्या नितेश राणेंना हिंदू धर्मरक्षक ही उपाधी तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते जनतेने दिली.

आतापर्यंत सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, अहिल्या नगर, नाशिक, शिर्डी, श्रीरामपूर, या भागांमध्ये निघालेल्या अतिविराटहिंदू मोर्चाचे नेतृत्व नितेश राणेंनी केले. नुकतेच त्र्यंबकेश्वर दौरा करून हिंदू मंदिरांवर अतिक्रमण करू पाहणाऱ्या धर्मांध लोकांना मनसुबा हाणून पाडला व मंदिरात महाआरती करून हिंदूंची ताकद दाखवून दिली.

४ जून रोजी पुण्यातील मुंढवा भागात आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू मोर्चा काढण्यात आला. एका हिंदू भगिनीला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन फूस लावून पळवून नेले होते त्या मुलीची त्या धर्मांधांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. त्या मुलीने स्वतः मोर्चात स्वतः सहभाग घेऊन आमदार नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेत स्वतःचे अनुभव कथन केले. कसे धर्मांतर साठी प्रवृत्त केले जाते, बुरखा घालण्याची तसेच कुराण पठण ची जबरदस्ती हिंदू मुलींवर करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा रोखठोक इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला व त्या बळी पडलेल्या मुलीची सुटका करण्यात आली.

पुण्यातील दौंड शहरात बादशहा शेख या व्यक्तीने हिंदूं महिला भगिनींवर अत्याचार करत हिंदूं कुटुंबांवर हल्ले केले, त्यावेळी दौंड शहरात मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला जाब विचारला गेला, आमदार नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर अनेक दिवस फरार असलेला बादशहा च्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

नगर च्या कापड बाजारात धर्मांध लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानदार हिंदू व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास दिला, हिंदू व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ले केले, त्याच कापड बाजारात जाऊन नितेश राणेंनी धर्मांध लोकांना इशारा देऊन तिथल्या व्यापाऱ्यांना खंबीर साथ दिली. शिवाय नगरमध्ये जिथे जिथे हिंदूंवर हल्ले अत्याचार झाले त्यांना भेटून धीर देत त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहिले.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. आज महाराष्ट्रात कुठेही हिंदू अत्याचाराची घटना घडली तिथे नितेश राणेंनी भेट द्यावी अशी मागणी होते. हिंदूंसाठी रोखठोक बोलणारा समोरच्यांना निर्भीडपणे जशास तसे उत्तर देणारा आणि न्याय मिळवून देणारा नेता अशी ओळख आज महाराष्ट्रभर झाली आहे. अनेक मुलींची जिहादींच्या तावडीतून सुटका करून हिंदू माता भगिनींच्या पाठीशी भाऊ बनून उभे राहिले आहेत. जिथे जिथे हिंदूंवर अन्याय झाला तिथे तिथे आमदार नितेश राणे मदतीसाठी धावून आले. म्हणूनच आज महाराष्ट्रभर हिंदुत्वाची ज्वलंत तोफ ओळखले जाणारे दमदार आमदार नितेश राणे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो! धर्मकार्यात त्यांचे योगदान असेच उत्तरोत्तर वाढत जावो !

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -