
मुंबई: कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आज शिवसेना ठाकरे गटाचे सुरज चव्हाण यांना चौकशीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ईडीने बुधवारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या दरम्यान जवळपास १५ ते १७ तास चौकशी करण्यात आली होती.
सूरज चव्हाण यांचा घोटाळ्याशी काय संबंध आहे ?
ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. याचा संबंध सुरज चव्हाण यांच्याशी होता, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांचे उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
या सगळ्या प्रकरणांमध्ये आरोप नेमके काय आहेत?
- आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट
- करारासाठी बनावट कागदपत्रे सादर
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली
- 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
-38 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा