
मुंबई : औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे-शिवरायांची जनता, असे शब्द असलेला बॅनर मुंबईतील माहिम परिसरात लागला होता. माहिम परिसरात असलेल्या केसरी टूर्स ऑफिसच्या समोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर झळकवण्यात आले. मात्र पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हे पोस्टर तात्काळ हटवले. परंतु हा खोडसाळपणा कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष बाब म्हणजे शिवसेनेने या बॅनरविरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
या बॅनरवर #uddhavthackerayforaurangazeb असा हॅशटॅग लिहिला होता. तसेच उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटोही लावण्यात आला होता.