Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Bakari Eid: छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न देण्याचा निर्णय

Bakari Eid: छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न देण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर:  २९ जूनला आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण एकत्र येत आहेत त्या पार्श्वभुमीवर राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बकरी ईदनिमित्ताने करावयाच्या सुरक्षा योजनांवर चर्चा झाली. त्याचवेळी, छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे मुस्लीम बांधवांनी शहरात कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी त्या दिवशी बकरा कुर्बानी न देण्याचे ठरवले आहे.


सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा देखील या बैठकीत निर्णय झाला.



नांदगाव येथे बकरी ईदसाठी लाखोंची उलाढाल


येत्या २९ तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी नाशिकच्या नांदगाव येथील आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी - विक्री झाली. पाच हजार रुपयांपासून ते  ४०  हजार रुपये किंमतीच्या बोकडांची मागणी आज बाजारात होती.

Comments
Add Comment