मुंबई : मुंबईतील ठाकरे गटाच्या अनधिकृत शिवसेना शाखेवर महापालिकेने आज सकाळी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई (BMC action) केली.
वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आले होते. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय तयार करण्यात आले होते. त्यावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली.
काँग्रेसचे स्थानिक आमदार जीशान सिद्दीकी यांच्या तक्रारीनंतर पालिकेने ही कारवाई केल्याचे समजते. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मात्र शिंदे गटाकडे संशयाचे बोट दाखवत आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra