
शिल्पा शेट्टीचा फिटनेस प्रवास आणि वर्कआऊट व्हिडिओची अनोखी चर्चा!
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अभिनयात प्रत्येक भूमिका जितकी चोख पार पाडते त्याच सोबतीने तिचा फिट राहण्याचा प्रवास सगळ्यांना प्रेरणा देऊन जातो. अभिनेत्री, उद्योजक, गुंतवणूकदार, आई अशा विविध भूमिका बजावत तिने आपली अनोखी ओळख संपादन केली आहे.
कलाकार नेहमी एका भूमिकेतून दुस-या भूमिकेत गियर बदलत असतात आणि या धकाधकीच्या आयुष्यात अॅक्टिंग आणि फिट राहणं आणि कॅमेरा समोर परफेक्ट दिसणं देखील तितकच महत्त्वाचं आहे म्हणून शिल्पा तिच्या फिटनेसला कधीच ब्रेक न देता वर्षानुवर्षे तिचा फिटनेस जपताना दिसते. (Shilpa Shetty Has Stayed Fit With A Balanced Approach to Yoga and Exercising) भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत नावांपैकी शिल्पा ओळखली जाते.
View this post on Instagram
एका दशकापूर्वी डेटिंग करताना शिल्पा शेट्टी ही पहिली अभिनेत्री होती जी योगा डीव्हीडी व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आली. जेव्हा फिट राहण्या बद्दल ना चर्चा होत्या ना जिम चा ट्रेंड होता, तेव्हा शिल्पाने वर्कआउट व्हिडिओ पोस्ट केले होते आणि तिच्या निरोगी आयुष्याबद्दल ती बोलली होती.
आजवर शिल्पाने अनेक लोकांना तिच्या फिटनेस प्रवासाने प्रेरणा दिली. तिचं वर्कआउट्स फक्त कार्डिओ पर्यंत मर्यादित न राहता वेट ट्रेनिंग, डान्स वर्कआउट्स आणि योगा यांचे मिश्रण आहे. सोशल मीडियावर शिल्पाच्या मंडे वर्कआऊटच्या चर्चा रंगतात. तिच्या या पोस्ट ने अनेकांच्या सकारात्मक जीवनावर परिणाम झाला आहे.
शिल्पा फुडी तर नक्कीच आहे पण तिचा कल हा नेहमीच काहीतरी पौष्टीक खाण्याकडे असतो तिच्या डाएट बद्दल देखील ती सोशल मीडियावर नेहमीच बोलताना दिसते. स्वतः फिट राहून शिल्पा अनेकांना फिट राहण्यासाठी प्रेरित करते यात शंका नाही.
तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल विचारले असताना शिल्पा म्हणते "मला विश्वास आहे की योगा हा माझ्या फिटनेसचा एक अविभाज्य भाग आहे कारण तो मला शांत, आरामशीर आणि एकाग्र राहण्यास मदत करतो. योगामुळे मला मानसिकदृष्ट्या संतुलित राहण्यास मदत होते. माझ्या एकूणच जीवनासाठी महत्त्वाचे आहे. मी नेहमीच उत्तम जेवण्याच्या पद्धती वर भर देते आणि पौष्टीक खाऊन फिट राहते."
शिल्पा शेट्टी खऱ्या अर्थाने जगभरातील फिटनेस प्रेमींसाठी एक प्रेरणा आहे. या अभिनेत्रीकडे यंदा अनेक कमालीचे प्रोजेक्ट्स आहेत. सुखी, भारतीय पोलीस दल आणि केडीमध्ये शिल्पा दिसणार आहे.