Saturday, January 17, 2026

Solstice: आज सुर्य उशीरा मावळणार! कारण?

Solstice: आज सुर्य उशीरा मावळणार! कारण?

मुंबई: आज २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस (World Longest Day) असतो. या दिवशी दक्षिणायन (Summer Solstice) सुरु होतं. उत्तरायण (Winter Solstice) आणि दक्षिणायन या दोन स्थिती आहेत. सूर्याची उगवण्याची स्थिती दिवसेंदिवस दक्षिणेकडे झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन असं म्हटलं जातं.

पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. मात्र पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष हा २३.५ अंशात कललेला आहे. पृथ्वी २३.५ अंशात एका बाजूला कललेली आहे आणि त्याच स्थितीत ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी पृथ्वीचा उत्तर ध्रुवाचा भाग आणि दक्षिण ध्रुवाचा भाग सूर्याच्या जवळ येतो. त्यामुळे दर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य आणि पृथ्वीचे अंतर सारखेच असते.

उत्तरायण आणि दक्षिणायन यांचा कालावधी सहा महिने असतो. २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. दक्षिणायन सुरु झाल्यानंतर दिवस छोटा होऊ लागतो तर रात्र मोठी होऊ लागते. तर उत्तरायण सुरु झाल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. दक्षिणायन लागल्यानंतर आषाढी एकादशी येते. या एकादशीलाच देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. या काळात मुंज, लग्न अशी शुभ कार्य केली जात नाहीत. मात्र विविध व्रत वैकल्यं, उपास, तीर्थयात्रा आणि दान धर्म केले जातात अशी श्रद्धा आहे.

Comments
Add Comment