Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीPune Crime: पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पतीने उचलले धक्कादायक पाऊल!

Pune Crime: पत्नीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पतीने उचलले धक्कादायक पाऊल!

पुणे: दौंड तालुक्यातील वरंवड गावात (Varanwad Village) मंगळवारी कौटुंबिक वादातून एका डॉक्टर पतीने आपली पत्नी आणि दोन लहान मुलांची निर्घृण हत्या (Brutal murder) करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितानुसार, वरवंड येथील गंगासागर पार्क येथील खोली क्रमांक २०१ मध्ये दिवेकर दांपत्य आपल्या मुलांबाळांसह राहत होते. दुपारी एका व्यक्ताने त्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे सदर व्यक्तीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित व्यक्तीने आरडाओरड केली असता, परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दार उघडून बघितले असता, अतुल यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा पल्लवी (वय ३५) मृतदेह खाली निपचित पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेचा माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी दोन्ही मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली आणि घरी जाऊन स्वत:ही गळफास घेऊन आपली जीवनायात्रा संपवली.

डॉ. दिवेकर यांचा मुलगा आदित अतुल दिवेकर (वय ११) व मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (वय ७) यांचे मृतदेह घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आले. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -