Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीInternational Yoga Day : जगाला आपले बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग

International Yoga Day : जगाला आपले बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले संबोधित

यूएन : तब्बल १८० देशांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएनमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालय परिसरात आयोजित योग कार्यक्रमात योगासने करून योग दिवस साजरा केला. यामुळे देशातच नव्हे तर विदेशात देखील भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. आता संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्यासाठी, संपूर्ण जगाला आपले बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग. जगामध्ये भारताची ओळख निर्माण करण्याचा मार्ग योगासने झाला, असे मला वाटते, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.

योगासन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार मानले. पीएम मोदी म्हणाले की, योग म्हणजे एकत्र येणे. ९ वर्षांच्या आठवणी ताज्या झाल्या, आज या विशेष कार्यक्रमात अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. योग म्हणजे आपल्याला एकत्र आणणे. तुम्ही योगा कुठेही करू शकता, एकट्यानेही करता येईल, योग ही जीवनशैली आहे. हे पूर्णपणे कॉपीराइट मुक्त आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, येथे जवळपास प्रत्येक राष्ट्रीयत्वाचे लोक उपस्थित आहेत. योग म्हणजे सामील होणे, म्हणून तुम्ही एकत्र येत आहात. ही योगाच्या दुसर्‍या स्वरूपाची अभिव्यक्ती आहे. योग भारतातून आला आहे, ही जुनी परंपरा आहे. योगावर कॉपीराइट नाही. हे पेटंट आणि रॉयल्टी मुक्त आहे. योगामुळे तुमचे वय आणि तंदुरुस्ती टिकून राहते. ते पोर्टेबल आहे. फक्त निरोगी राहण्यासाठीच नव्हे तर स्वत:बद्दल आणि इतर लोकांप्रती आपुलकीच्या भावनेने योग करा, असंही मोदी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -