मुंबई : मुंबईतील (Mumbai) लोअर परेलमध्ये (Lower Parel) ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या (Trade World building in Lower Parel) चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. (Lift Collapse) या अपघातात १३ जण जखमी झाले.
सेनापती बापट मार्ग, कमला मिल येथील ट्रेड वर्ल्ड येथे आज सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळली. यामध्ये १३ जण जखमी झाले असून यापैकी ८ जणांना ग्लोबल आणि एकाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर चार किरकोळ जखमींनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. जखमींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी नसल्याचे समजते.
या अपघातात प्रियंका चव्हाण (वय २६ वर्षे), प्रतीक शिंदे (वय २६ वर्षे), अमित शिंदे (वय २५ वर्षे), मोहम्मद रशीद (वय २१ वर्षे), प्रियांका पाटील (वय २८ वर्ष), सुधीर सहारे (वय २९ वर्षे), मयूर गोरे (वय २८ वर्षे), तृप्ती कुबल (वय ४६ वर्षे) हे जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहेत. तर किरण विश्वनाथ चौकेकर (वय ४८ वर्षे) या जखमीला केईएम रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.