Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Rain forecast: उकाड्याने हैराण महाराष्ट्रात अखेर पावसाची एन्ट्री ‘या’ दिवशी होणार

Rain forecast: उकाड्याने हैराण महाराष्ट्रात अखेर पावसाची एन्ट्री ‘या’ दिवशी होणार

पुणे: जूनमध्येही उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात दिलासा देणारी घटना घडणार आहे. ज्या पावसाची सर्वजण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत तो पाऊस महाराष्ट्रात येत्या 23 तारखेनंतर अर्थात येत्या शुक्रवारनंतर दाखल होणार आहे. हवामान विभागाने याची माहिती दिली आहे.


एरवी ७ जूनला येणाऱ्या पावसाने, यंदा चांगलीच हुलकावणी दिली आहे. हवामान विभागाने २३ जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. ही दिलासादायक गोष्टय. दरम्यान, यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. आणि जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस असेल, आणि २१ जूनपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, असे सांगण्यात आले आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Comments
Add Comment