मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह विधान सभा, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पडद्यामागची सूत्र हलवणारे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. विविध निवडणुकांमध्ये पडद्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात.
आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.