tere ishq mein : ‘रांझणा’चे दशकपूर्ती वर्ष साजरे करत असताना ‘तेरे इश्क में’ साठी आनंद एल राय आणि धनुष यांचा अनोखा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
मुंबई : दूरदर्शी चित्रपट निर्माते आनंद एल राय हे प्रेक्षकांना नेहमीच वेगळ्या थाटणीचे सिनेमे देत असतात. त्याच्या अनोख्या कथा आणि दिग्दर्शनाची दूरदृष्टी यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट खास असतो. प्रेक्षकांना मोहित त्यांची शैली सर्वदूर आहे.
आनंद एल राय यांच्या दिग्दर्शन प्रवासातील सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे “रांझणा” या चित्रपटाने आज तब्बल १० वर्ष पूर्ण केली असून आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
या सुपरहिट चित्रपटाची १० वर्ष पूर्ण करत असताना आनंद एल राय यांनी त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. “तेरे इश्क में” हा नवाकोरा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ही फक्त एक घोषणा नसून यात अजून एक खास सरप्राइज आहे ते म्हणजे प्रतिभावान अभिनेता धनुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समजतंय.
आनंद एल राय आणि धनुष ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम करणार आहे आणि यातून नक्कीच काहीतरी अफलातून कलाकृती घडणार आहे यात शंका नाही.
ही धमाकेदार घोषणा केल्यानंतर दिग्दर्शक आनंद एल राय म्हणतात, “धनुषसोबत ‘तेरे इश्क में’ या आमच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आज सारखा खास दिवस आला आहे हा एक अनोखा योगायोग आहे. ‘रांझणा’ हा एक चित्रपट नसून ती एक भावना आहे. माझ्या हृदयात या चित्रपटासाठी विशेष प्रेम आहे. जगभरातील चाहत्यांकडून या चित्रपटासाठी मिळणार प्रेम नक्कीच हृदयस्पर्शी आहे.
“धनुषने रांझणाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि तो आजच्या काळातील सर्वात मोठा स्टार म्हणून नाव कमावतो आहे. त्याच्या अफाट प्रतिभेने त्याला दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपट उद्योगांमध्ये मोठा चाहतावर्ग मिळवून दिला आहे. हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात धनुषची कलाकार म्हणून असलेली क्षमता ओळखण्यात आनंद एल राय यशस्वी ठरले.
Har har Mahadev 🙏🙏 My next Hindi film. https://t.co/mQeUXyi3dh pic.twitter.com/Abi7ajgaFx
— Dhanush (@dhanushkraja) June 21, 2023
आनंद एल राय यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय फिल्मोग्राफी केली आहे ज्यात “तनु वेड्स मनू,” “अतरंगी रे,” “गुडलक जेरी,” “अॅक्शन हिरो,” “हॅपी भाग जायगी, यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटाचा समावेश आहे. “”न्यूटन,” “तुम्बाड,” अशा असंख्य चित्रपटात त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिली आहे.
धनुष आणि आनंद एल राय या डायनॅमिक जोडीने लेखक हिमांशू शर्मा, गीतकार इर्शाद कामिल आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्यासमवेत २०१३ मध्ये “रांझणा ” चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर जादू निर्माण केली आणि तब्बल १० वर्षांनी आजही हा चित्रपट एव्हरग्रीन ठरतोय.
तब्बल १० वर्षांनी आता पुन्हा ‘तेरे इश्क में’ या नवीन चित्रपटातून पुन्हा एक जादुई अनुभव अनुभवयाला मिळणार यात शंका नाही. सह जादूचा अनुभव पुन्हा तयार करण्यासाठी सज्ज आहे. कलर यलो प्रॉडक्शनकडे “तेरे इश्क में”, “झिम्मा 2” आणि “फिर आयी हसीन दिलरुबा” असे अनेक कमालीचे चित्रपट आहेत.