Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadanvis : बंजारा समाजाला भाजपच न्याय देऊ शकतो : देवेंद्र...

Devendra Fadanvis : बंजारा समाजाला भाजपच न्याय देऊ शकतो : देवेंद्र फडणवीस

बंजारा समाजाच्या पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : बंजारा समाजाच्या (Banjara community) पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये (BJP) केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)यांनी बंजारा समाजाला भाजपच न्याय देऊ शकतो, असं महत्त्वपूर्ण विधान केलं. यावेळी बंजारा समाजाच्या हक्कांमध्ये कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra government) या समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे म्हणत त्यांनी बंजारा समाजाच्या पदाधिकार्‍यांना आश्वस्त केले.

जे बजेट आमच्याकडून देण्यात आलं आहे, त्यात भटक्या विमुक्त समाजाकरता अनेक योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या ‘मोदी आवास योजने’मध्ये जास्तीत जास्त बंजारा समाजातील लोकांना कसं समाविष्ट करता येईल, ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचं काम हे तुमच्या नेतृत्वाखाली तयार झालं पाहिजे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी बंजारा समाजाच्या पदाधिकार्‍यांना केली. तसेच जेवढी घरं मागाल तेवढी घरं आम्ही देऊ, असं आश्वासन दिलं.

प्रत्येक तांड्यापर्यंत रस्ता, पिण्याचं पाणी, विकास पोहोचला पाहिजे, यासाठी संत सेवानंद महाराजांच्या नावाने अभियान सुरु केलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच तोडगा काढला जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तरुणाईच्या हाताला काम देणार

महामंडळाच्या माध्यमातून नवीन योजना तयार करुन, निधी पुरवून बंजारा समाजाच्या तरुणाईच्या हाताला काम दिलं जाईल. कुठेही महामंडळाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच बंजारा समाजाशिवाय भारतीय संस्कृती अपूर्ण आहे, असं महत्त्वपूर्ण विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -