भाईंदर : मीरारोड येथिल एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना बोलावून घेऊन त्यांना आमदार गीता जैन यांनी मारहाण करण्याचा प्रकार पेणकर पाडा भागात घडला असुन त्याचा व्हिडिओ शहरात प्रचंड वायरल झाला आहे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होत असल्याच्या भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी या दोघांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पेणकर पाडा भागातील कक्कड इमारती जवळील अनधिकृत पक्के बांधकामावर चार दिवसांपूर्वी तोडक कारवाई केली होती. त्याच ठिकाणी आज या दोन्ही अभियंता यांना आमदार गीता भरत जैन यांनी बोलावून घेतले आणि महापालिका सुरक्षा रक्षक, आमदारांचे सुरक्षा रक्षक, त्यांचे स्विय सहाय्यक तसेच इतर कार्यकर्ते यांच्यासमोर मारहाण केली. त्याचे शर्ट पकडून त्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सुध्दा शहरात वायरल झाला आहे.
या प्रकाराचा महापालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून, अशा प्रकारामुळे इतर कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होते, त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होतो, अशा भावना अभियंत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कायदा हातात घ्यायचा आमदारांना अधिकार नाही, त्या एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी समाजाला दिशा द्यायची असते त्याच हिंसा करायला लागल्या तर कसे व्हायचे, अहिंसाच्या मार्गाने चालणाऱ्या आमदार हिंसा करताना पाहून आश्चर्य झाले, त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक व्हावी, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. – गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,
Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra