Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीLive in Relationship : आता लिव्ह-इनमध्ये खुशाल रहा!

Live in Relationship : आता लिव्ह-इनमध्ये खुशाल रहा!

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना मोठा दिलासा

विवाहित महिलांना बॉयफ्रेंडसोबत राहण्यास परवानगी, उत्तराखंड हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

उत्तराखंड : संपूर्ण देशभरात लिव्ह-इन रिलेशनशिपवरून (Live in Relationship) वाद पेटलेला असतानाच उत्तराखंड हायकोर्टाने (Uttarakhand High Court) लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका कौटुंबिक कलह प्रकरणाची सुनावणी करताना हायकोर्टाने महिलांना लग्न झाल्यानंतरही परपुरुषांसोबत राहण्यास परवानगी देण्याचा निकाल उत्तराखंड हायकोर्टाने दिला.

विवाहित महिलेची इच्छा असेल आणि ती प्रियकरासोबत राहत असेल तर त्यावर कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, असे उत्तराखंडमधील उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता विवाह झालेल्या पुरुष तसेच महिलांनाही आवडत्या व्यक्तींसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याची कायदेशीर परवानगी मिळाली आहे.

पत्नी माहेरून परत येत नसल्याच्या कारणाविरोधात पतीने थेट हायकोर्टात धाव घेतली होती. यावर कोर्टात उपस्थित असलेल्या महिलेने न्यायमूर्तींसमोर सांगितले की, माझा पती चांगला वागत नाही, तो सातत्याने माझ्याशी दुर्व्यवहार करत असल्यानेच मी माझ्या प्रियकरासोबत माझ्या मर्जीने राहण्याचा निर्णय घेतला. याशिवाय पतीने कोर्टात केलेले सर्व आरोप महिलेने फेटाळून लावले.

त्यावर सुनावणी करताना जस्टिस मनोज कुमार तिवारी आणि जस्टिस पंकज पुरोहित यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले की, महिला तिच्या प्रियकरासोबत तिच्या मर्जीने राहत आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही. महिलेने पतीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे सांगत हायकोर्टाने प्रतिवादी पतीच्या सर्व याचिका फेटाळून लावत विवाहित महिलेला मोठा दिलासा दिला आहे. यावेळी कोर्टाने महिलेला कोर्टरुममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

दरम्यान, दिल्लीतील आफताब पुनावाला आणि मुंबईतील मनोज साने प्रकरणानंतर देशभरात लिव्ह इन-रिलेशनशिपवर जोरदार वाद सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचेही पाहायला मिळाले. परंतु आता उत्तराखंड हायकोर्टाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या विवाहित जोडप्यांना दिलासा देणारा निकाल दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -