Friday, May 9, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

adipurush : 'आदिपुरुष' चित्रपटाचा लेखक घाबरला, केली 'ही' मागणी

adipurush : 'आदिपुरुष' चित्रपटाचा लेखक घाबरला, केली 'ही' मागणी

मुंबई : साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' (adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु आहे. एकीकडे या चित्रपटाला विरोध होत आहे तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे.


आदिपुरुष चित्रपटाची कथा आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या संवादांबाबत देशभरात निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. हा गोंधळ पाहता आदिपुरुष चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरुन मनोज यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.


त्यानंतर मुंबई पोलिसांनी निर्णय घेत मनोज यांना सुरक्षा पुरवली आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टार 'आदिपुरुष' चित्रपट १६ जून रोजी म्हणजेच शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संवादावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या चित्रपटावर टीकादेखील केली जात आहे. यासोबतच चित्रपट निर्मात्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment