Monday, June 30, 2025

RAW : ‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती

RAW : ‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती

नवी दिल्ली : देशाची गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या (Research and Analysis Wing) प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. विद्यमान ‘रॉ’ (RAW) प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने सिन्हा यांच्या नावाला मान्यता दिली आहे. सिन्हा हे छत्तीसगड कॅडरचे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.


मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी रॉचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. सिन्हा यांनी सामंत कुमार गोयल यांची जागा घेतली आहे. गोयल हे ३० जून २०२३ रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.

Comments
Add Comment