मुंबई : वडाळ्याचे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांच्या पत्नी नम्रता कोळंबकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
सृष्टी बिल्डींग, फ्लॅट नंबर ७०२, ग. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा नाका, परेल भोईवाडा येथून सायंकाळी ६:०० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
माझे मित्र आ. कालिदास कोळंबकर यांच्या पत्नी श्रीमती नम्रता यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. मी परदेशात असल्याने भेटू शकत नाही.श्री. कोळंबकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात माझ्या सहसंवेदना आहेत. श्रीमती नम्रता यांच्या आत्म्यास शांती लाभो!
ॐ शांती🙏— Narayan Rane (@MeNarayanRane) June 19, 2023
वडाळा विधानसभेचे ज्येष्ठ आमदार मा. कालीदासजी कोळंबकर यांच्या पत्नी श्रीमती नम्रता कालीदास कोळंबकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. कोळंबकर साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
कै. नम्रता कालीदास कोळंबकर यांच्या आत्मास ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना!… pic.twitter.com/4NhLduOLRV— nitesh rane (@NiteshNRane) June 19, 2023