Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

Biparjoy Cycolne: बिपरजॉयचे राजस्थानात थैमान, 'इतके' जण दगावले!

Biparjoy Cycolne: बिपरजॉयचे राजस्थानात थैमान, 'इतके' जण दगावले!

उदयपूर: चक्रीवादळ बिपरजॉयने (Bipayjoy Cyclone) राजस्थानमध्ये (Rajsthan) थैमान घातले आहे. रविवारी वादळामुळे पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस झाला. राजस्थानात गेल्या २४ तासांत ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर विविध दुर्घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला.


गेल्या २४ तासांत सांचौरमध्ये २२, माउंट अबू-१५, शिवगंज-१३.२५ इंच पावसाची नोंद झाली. ५०० हून जास्त गावांत वीजपुरवठा खंडित झाला. पाली, जालौर, बाडमेर, सिरोही चारही जिल्ह्यांत मान्सूनमधील कोटा पूर्ण झाला आहे.


दरम्यान, वाळवंटात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांत पाच फूट पाणी साचले पाली जिल्ह्यात ८, तर सांचौरमध्ये ५ बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. पांचला धरण फुटल्याने सांचौर जलमय झाले.

Comments
Add Comment