मुंबई: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमावर टीका होत आहे. या सिनेमातील काही वादग्रस्त संवादांमुळे समाज माध्यमांवर प्रचंड टीका होत आहे. पण आता आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
‘आदिपुरुष’ सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले.
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023