Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Pandhari Wari 2023 : पंढरीवारीसाठी रेल्वेची भाविकांना खास भेट! नेमकी काय? वाचा सविस्तर

Pandhari Wari 2023 : पंढरीवारीसाठी रेल्वेची भाविकांना खास भेट! नेमकी काय? वाचा सविस्तर

पंढरपूर: आषाढी एकादशीसाठी (Ashadhi Ekadashi) भक्तीचा महापूर ओसंडून वाहत असून राज्यभरातून पालख्या (Payi dindi Palkhi) पंढरपूरला (Pandharpur) पोहोचत आहेत. आता राज्यातील इतर भाविकांसाठी रेल्वेने (Railway) पंढपूरला जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २४ जून पासून मध्य रेल्वे (Central Railway) ७६ तर दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway) ६ पंढरपूर आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. यातील १८ गाड्या मनमाडमार्गे (Manmad) धावणार आहेत.


या गाड्यांमध्ये नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी तर नांदेड-आदिलाबाद, छत्रपती संभाजी नगर, कुर्डूवाडी अशा एकूण ८२ गाड्या धावतील. त्यातील काही भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड मार्गे धावणार आहेत तर भुसावळ-पंढरपूर अशा दोन विशेष गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


रेल्वे गाड्यांचे टाईमटेबल:









Comments
Add Comment