Friday, December 13, 2024
HomeदेशHeatwave: उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने हाहाकार! तब्बल 'इतक्या' लोकांचा उष्णतेने मृत्यू...

Heatwave: उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने हाहाकार! तब्बल ‘इतक्या’ लोकांचा उष्णतेने मृत्यू…

पाटणा: देशभरात उन्हाचा पारा चढला असून, उत्तर भारतात उष्णतेची लाट आली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागील दोन दिवसांत उष्णतेमुळे जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत यूपीमध्ये ५४, तर बिहारमध्ये ४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ताप, धाप लागणे आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे ४०० हून अधिक लोकांना गेल्या तीन दिवसांत बलिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतांश रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

बलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जयंत कुमार यांनी सांगितले की, अति उष्णतेमुळे सर्व रुग्णांची प्रकृती बिघडली आहे. तसेच, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि अतिसार, हे मृत्यूचे कारण आहे.

बिहारमध्ये पाटण्यात ३५, नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये १९ आणि पाटणा वैद्यकीय महाविद्याल तसेच रुग्णालयात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाटण्याचे कमाल तापमान ४४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पाटणा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये २४ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणामध्ये २० जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे या राज्यातील नागरिकांना सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेच्या लाटेच्या उद्रेकाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध आणि मजुरांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सल्ला दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -