Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीMarine Drive Murder case : 'त्या' तरुणीवर झाला होता बलात्कार!

Marine Drive Murder case : ‘त्या’ तरुणीवर झाला होता बलात्कार!

मरीन ड्राईव्ह हत्या प्रकरणात आणखी एक धागा

मुंबई : मरीन ड्राईव्ह वसतिगृहातील हत्या प्रकरणात (Marine Drive Murder case) फॉरेन्सिक अहवालामधून (forensic report) ‘त्या’ तरुणीवर बलात्कार (Rape) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय हा बलात्कार आरोपी ओम प्रकाश कनोजिया (Om Prakash Kanojia) यानेच केला असल्याचे सिद्ध झाले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या नखांवरून मिळालेल्या डीएनए नमुन्यासोबत (DNA Sample) आरोपी ओम प्रकाश कनोजियाच्या हाडाचे डीएनए नमुने जुळले आहेत. पोलिसांनी पुढे सांगितलं की, ‘घटनास्थळी ठिकाणी सापडलेल्या सीमेन सँपलचे डीएनए मुलीच्या नेल क्लिपिंगमधून मिळालेल्या डीएनए प्रोफाइलशी जुळले आहेत.’ तसेच व्हजाइनल स्वॅब तपासणीतही लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पीडितेच्या नखांत हे नमुने सापडल्यामुळे आरोपी कनोजिया जबरदस्ती करत असताना तिने प्रतिकार केला होता, हे स्पष्ट झाले आहे.

तरुणीवर बलात्कार करुन नंतर वसतिगृहाचा सुरक्षारक्षक कनोजियाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक तपासाणीनंतर पोलिसांचा अंदाज होता. मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या शवविच्छेदन अहवालात तरुणीवर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं नमूद केलं होतं. यामुळे फॉरेन्सिक अहवालातच काय ते स्पष्ट होईल असं सांगण्यात आलं. फॉरेन्सिक अहवाल आता पोलिसांच्या हाती आला असून कनोजियानेच बलात्कार केला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय आहे प्रकरण ?

मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षांच्या तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या घटनेपासून वसतिगृहाचा सुरक्षारक्षक ओम प्रकाश कनोजिया गायब होता. त्याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकांदरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे नंतर उघडकीस आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -