सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई : दादर पूर्वेकडील पलाई प्लाझा या इमारतीला आज सकाळी ७:३० वाजता अचानक आग लागली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्याचे समजताच अग्निशमन यंत्रणेने तातडीने पोहोचून आग विझवण्यात यश मिळाले. यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.