Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीCruelty : मालकाने कामाला जुंपून ठेवलंय; असं तसं नव्हे तर चक्क साखळदंडाने...

Cruelty : मालकाने कामाला जुंपून ठेवलंय; असं तसं नव्हे तर चक्क साखळदंडाने बांधून!

धाराशिवमध्ये माणुसकीला कलंक ठरणारी घटना

धाराशिव : कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांकडून बॉसने कामाला जुंपून ठेवलंय असं वारंवार बोललं जातं. पण बॉसने काम करण्यासाठी खरंच बांधून ठेवलं तर? ऐकून विचित्र जरी वाटलं तरी धाराशिव जिल्ह्यात माणुसकीला कलंक ठरणारी एक घटना समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ढोकी आणि खामसवाडी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका कंत्राटदारानं चक्क ११ मजुरांना ते पळून जाऊ नयेत, याकरता साखळदंडाने बांधून ठेवल्याचे आढळले आहे.

धाराशिव जिल्ह्यातल्या भूम (Bhum) तालुक्यातला संतोष शिवाजी जाधव या कंत्राटदाराने हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर इथून शेतमजूर आणले होते. या मजूरांकडून तो दिवसभर बळजबरीने विहीरीवर काम करुन घेत असे. एवढंच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही या मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलं जात होतं. जेवण आणि शौचासाठीही या मजुरांना परवानगी दिली जात नव्हती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हे मजूर घाबरलेल्या अवस्थेत साखळदंडाने बांधलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि काल १७ जूनला शनिवारी रात्री हे मजूर आपल्या गावी परत गेले.

कोण आहेत शेतमजूर ?

मिळालेल्या माहितीवरुन याबाबत तपास करण्यासाठी अतुल कुलकर्णी या पोलीस अधिका-यांनी एक पथक तयार केले. या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेतमजूर साखळदंडाने बांधलेले आढळून आले. संदिप रामकिसन घुकसे (वय २३ वर्षे रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली), भगवान अशोक घुकसे, (२६ वर्षे, रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली) यांच्यासह मारुती पिराजी जटाळकर (वय ४० वर्षे,रा. आतकुर, ता. धर्माबाद), राजू गनुलाल म्हात्रे (वय २२ वर्षे रा. मध्य प्रदेश), मंगेश जनार्दन कानटजे (वय २६ वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, बालाजी शामराव वाघमारे (वय ३२ वर्षे, रा.लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड), गणेश अशोक पवार,(वय ३० वर्षे, रा. नाशिक) अशी या शेतमजुरांची नावे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -