समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रचंड व्हायरल
पटियाला : आपल्या मायभूमीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करणार्या भारतीय जवानांचं (Indian Army Soldiers) नाव काढलं की भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येतो. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी भारतीय जवान किती तत्पर असतात, हे पटवून देऊन भारतीय जवानांची मान उंचावणारी आणखी एक घटना आज पंजाबमध्ये (Punjab) घडली.
पंजाबमधील पटियालाजवळील भाक्रा कालव्यात एक तरुणीने उडी मारली, ती कालव्यात बुडू लागली. कालव्याजवळ असलेल्या लोकांचे तिच्याकडे लक्ष गेले. मदत करायला सगळेच पुढे सरसावले. पण तिथे उपस्थित असलेल्या भारतीय लष्कराचे जवान डी. एन. कृष्णन (D. N. Krishnan) यांनी कालव्यात उतरुन त्या मुलीला पाण्याबाहेर काढले व तिचा जीव वाचवला.
#WATCH | Indian Army soldier, Sepoy DN Krishnan jumped into the ferocious Bhakra Canal near Patiala, Punjab & rescued a drowning teenage girl who had fallen in the canal: PRO Defence Chandigarh
(Video source: PRO Defence Chandigarh) pic.twitter.com/eJWZPSDbrm
— ANI (@ANI) June 18, 2023
चंदीगडच्या डिफेन्स पीआरओने (Defence PRO) या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय जवान कालव्यात बुडत असलेल्या तरूणीला काठापर्यंत आणतो आणि उपस्थित लोक तिला बाहेर काढतात, असं या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यात बचावकर्त्या जवानाच्या धाडसाचे सगळेच खूप कौतुक करत आहेत.