Saturday, December 13, 2025

shivshahi : पुण्यात शिवशाही बसला आग

shivshahi : पुण्यात शिवशाही बसला आग

पुणे नाशिक महामार्गावरील घटना; प्रवासी सुखरूप

चाकण : पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकामध्ये नाशिकहून पुण्याकडे येणा-या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने (एमएच ०९ ईएम २६०७) आज (शनिवारी) दुपारी बाराच्या सुमारास अचानक पेटली.

यावेळी बसमध्ये सुमारे २५ प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्याची बाब निदर्शनास येताच सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.

त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटात घटनास्थळी दाखल झालेल्या चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या अग्निबंबाने ही आग विझवण्यात आली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मात्र महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >