Thursday, September 18, 2025

PM Modi's America Visit: मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात होणार 'हा' क्रांतिकारी बदल!

PM Modi's America Visit: मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात होणार 'हा' क्रांतिकारी बदल!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्याला नव्या उंचीवर नेण्यासाटी वॉशिंग्टन डीसीमध्ये २१ जून रोजी पहिल्या ‘इंडस एक्स’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २०२५ पर्यंत संरक्षण निर्यात ४० हजार कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.

दोन्ही देशांनी सामायिक गरजांसाठी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळून काम करावे, हा यामागचा उद्देश असून याअंतर्गत ड्रोन, जेट इंजिन, तोफा, लष्करी वाहने व अन्य संरक्षण उपकरणांची निर्मिती एकत्रितपणे करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेने संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरणातील कायदेशीर तिढ्यातून वाचण्यासाठी हा मध्यम मार्ग काढला आहे. क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (आयसीईटी) डिफेन्स इनोव्हेेशन ब्रिज कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही देशांच्या संयुक्त आव्हानांवर काम होईल. दोन्ही देशांच्या संरक्ष्ण स्टार्टअप्सच्या एकत्रित कामासाठी जॉइंट वर्किंग ग्रुप तयार करण्यात येणार आहे. इंडो-यूएस जॉइंट इनोव्हेेशन फंड पीपीपी मॉडेलद्वारेे दोन्ही देशांच्या डिफेन्स स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळेल. यासोबतच, डिफेन्स इनोव्हेेशनसाठी दोन्ही देशांच्या प्रमुख विद्यापीठांमध्ये करार होतील.

अमेरिकी संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांचा भारत दौरा व सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांची अजित डोभाल यांच्याशी चर्चेनंतर हा मसुदा तयार झाला आहे.

अमेरिका दौऱ्यानंतर मोदींचा पहिला इजिप्त दौरा

मोदी २१ जूनला संयुक्त राष्ट्रसंघात योग दिन सोहळ्याचेे नेतृत्व करतील. २२ रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भेटतील. अमेरिकी काँग्रेसच्या बैठकीला मार्गदर्शन करतील. बायडेन यांनी रात्री मोदींच्या सन्मानार्थ भोजन ठेवले आहे. २३ जूनला पंतप्रधान मोदींसाठी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी भोजन ठेवले आहे. अमेरिकी सीईओ, व्यावसायिक, एनआरआयना मोदी भेटतील. त्यानंतर ते २४-२५ जून इजिप्तचा दौरा करतील. मोदींचा हा पहिला इजिप्त दौरा आहे.

Comments
Add Comment