Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीPandharichi Vari 2023 : वारक-यांच्या सेवेसाठी 'आपला दवाखाना' सज्ज; 'या' सुविधा पुरवल्या...

Pandharichi Vari 2023 : वारक-यांच्या सेवेसाठी ‘आपला दवाखाना’ सज्ज; ‘या’ सुविधा पुरवल्या जाणार

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली माहिती

सांगली : आषाढी एकादशीदरम्यान (Aashadhi ekadashi) निघालेल्या वारीत वारकरी आपली तहानभूक विसरुन विठूभक्तीत तल्लीन होतात. मात्र बरेचदा याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसून येतो. अशक्तपणा, अंगदुखी, उलटी, जुलाब, ताप, चक्कर येणे अशा गोष्टी उद्भवतात. यावर खबरदारी म्हणून यंदाच्या वारीत आरोग्य सेवा (Health services) पुरवण्याचा संकल्प जिल्हा परिषद आरोग्य विभागानं (Health Department) केला आहे. यामध्ये आरोग्य तपासणीसह इतरही उपचार पुरवण्यात येणार आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी यासंबंधी माहिती दिली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी वारीपासून वारकऱ्यांच्या सेवेत उतरत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील अन्य कर्मचारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वारीत टँकरमधील पाण्याचीही वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्यदूत, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ‘आपला दवाखाना’ (Aapla dawakhana) हा फिरता दवाखाना सज्ज झाला आहे, असं ते म्हणाले.

चित्ररथाद्वारे पालखीमार्गावर आरोग्यशिक्षण

याअंतर्गत आरोग्यदूतांची २२ पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. पालखीमार्गावर किमान पाच किलोमीटरवर एक आरोग्य पथक औषध साठ्यासह तैनात असणार आहे. रुग्णवाहिकेत डॉक्टर, आरोग्य सेविका, औषधांसह फिरते दवाखाने मुक्कामाच्या ठिकाणी मिळणार आहेत. पावसाळ्यामुळे कीटकजन्य आजार होऊ नयेत, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. एवढेच नव्हे तर चित्ररथाद्वारे पालखीमार्गावर आरोग्यशिक्षणदेखील (Health education) दिले जाणार आहे.

प्रथमोपचार किट्सची व्यवस्था

आरोग्य विभागाने अंगदुखी, उलटी, जुलाब, ताप आदी किरकोळ आजारांवरील औषधे असणारे एक प्रथमोपचार किट (First-aid kit) तयार केले आहे. हे किट दिंडीप्रमुखांकडे दिले जाणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी औषधे लागली तर वारकऱ्यांना ती तातडीने मिळू शकतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -