बीड: शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या परिसरात काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याचे समजते आहे. पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
बीड शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच चित्र आहे. अशातच शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या दरम्यान दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारीचं रूपांतर नंतर थेट गोळीबारात झालं. गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते. या दोघांवरही बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या दोन गटांमध्ये वाद होण्याचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र रात्री झालेल्या या गोळीबाराने शहरात काही काळासाठी तळावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकला. त्याचबरोबर या दोन्हीही गटातील लोकांचा प्रशासन शोध घेत आहे.