
ग्लान्सेबल डिरेक्शन्स (Glanceable directions)
गुगल मॅप्समध्ये हे फीचर काही महिन्यांतच जगभरात आणले जाईल. ग्लान्सेबल डायरेक्शन्स फीचर वापरुन युजर्स स्क्रीन लॉक असताना देखील आपला रस्ता ट्रॅक करु शकतात. हे फीचर चालू केल्यानंतर, वापरकर्त्यांना पुढे येणारे वळण किंवा कोणत्याही अपडेटबद्दल कळवले जाईल. यापूर्वी ही माहिती फक्त फुल नेव्हिगेशन मोडमध्ये दिली जात होती. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध करून दिले जाईल.
हेही वाचा...
अपडेट्स टु रिसेंट (Updates to Recents)
गुगल मॅप्सने आणखी एक फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स गुगल मॅप्सची विंडो बंद केल्यानंतरही शेवटचे ठिकाण सेव्ह करू शकणार आहेत. या फीचरमुळेस तुम्ही काही तासांपूर्वी शेवटी कुठे होता हे आठवायची गरज भासणार नाही. एखाद्या पिकनिकला गेल्यावर ट्रिप प्लॅन करताना जर तुम्ही मध्येच ब्रेक घेतला तरीसुद्धा तुम्ही आधी कुठे होता हे तुम्हाला कळेल; कारण ही ट्रिपच गुगल सेव्ह करणार आहे. एवढंच काय तर युजर्स एकाच वेळी अनेक ट्रिप प्लॅन करू शकतात. पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे फीचर भरपूर फायद्याचे ठरेल.
इमर्सिव्ह व्हिव (Immersive View)
लवकरच हे फीचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये, प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर करून, इमर्सिव्ह व्ह्यू फीचर अगदी वास्तवदर्शा स्थान, ठिकाणं तयार करते. यामध्ये अनेक महत्त्वाच्या माहितीचाही समावेश करण्यात आला आहे.