Friday, July 11, 2025

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर!

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर!

२३ जूननंतर पावसाची शक्यता


मुंबई : सध्या देशाच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट आहे. गुजरातला धडकलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे. दरम्यान, यामुळे देशात काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता २३ जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्या पुढील आठवड्यात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळेचक्रीवादळामुळे लांबणीवर गेलेला पाऊस आता आणखी रखडण्याची चिन्हं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.


मान्सून पुन्हा एकदा लांबल्यामुळे नागरिकांची निराशा झाली असून बळीराजाची चिंतेतही वाढ झाली आहे. राज्यातही अनेक भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment