Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : संजय राऊत पिसाळलेला कुत्रा!

Nitesh Rane : संजय राऊत पिसाळलेला कुत्रा!

Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : दिल्लीत एक भटका पिसाळलेला कुत्रा फिरतो आहे. तो दिसेल त्याला चावतो. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना चावतो. त्या कुत्र्याची नसबंदी कधी करणार, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला. काल मयुर शिंदे प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच हा बनाव रचल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आज आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले, की पाळीव कुत्रे हे मालकावर प्रेम करतात भटके कुत्रे आपल्या मालकालाही चावतात. ते कोणालाही चावू शकतात असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

ते म्हणाले, काल संपूर्ण महाराष्ट्राला संजय राऊत यांचं सत्य समजल्यावर हे श्री ४२० दिल्लीला पळून गेले. काल दिवसभर गायब होते. बघतो तर काय, हे दिल्लीत उगवलेले. पण मुंबई पोलिस त्यांना सोडणार नाहीत. आजचा सामनाचा अग्रलेख त्यांनी या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठीच लिहिला आहे. पण खरंतर कालपासून राऊत बंधूंची गाळण उडाली आहे. ते भयभीत झाले आहेत. मयुर शिंदे हा दुसऱ्याच पक्षाचा असल्याचा आणखी एक बनाव ते रचत आहेत. पण भांडूपमध्ये यांचा कलेक्टर कोण आहे हे सर्वांना माहित आहे.

बर्नोलची मागणी वाढली

ते पुढे म्हणाले, काल आमच्या जय-वीरुची दोस्ती सर्वांनी पाहिली तेव्हापासून बर्नोलची मागणी वाढली आहे. महाविकास आघाडीच्या ऑफिसेसमधून बर्नोल खुप विकत घेतलं जातंय. तिथे लंडनलापण बर्नोल गेलंय असं मला समजलं आहे. आमचं महायुतीचं सरकार गुण्यागोविंदाने चालत आहे हे यांना हजम होतच नाहीये. त्यात त्यांनी कितीही मीठाचा खडा टाकायचा प्रयत्न केला तरी त्यांचे प्रयत्न सफल होत नाहीयेत. त्यामुळे संजय राऊतांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं बंद करावं. आमचे टक्के काढण्यापेक्षा अडीज वर्षात तुम्ही किती टक्के खाल्ले हे पाहावं. संजय राऊत यांनी बर्नोलचा बॉक्स आता लंडनला पाठवावा असा खोचक सल्लाही यावेळी नितेश राणे यांनी दिला.

समान नागरी कायदा हवाच

यावेळी समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्यांचाही नितेश राणे यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरेंचं सरकार हे हिंदूविरोधी होतं. आमचं सरकार हे हिंदूंचा विचार करणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान नागरि कायदा यावं असं वाटतं. पण महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारने केलेला ट्रिपल तलाक विरोधी कायद्यावर टीका केली होती. ट्रिपल तलाक कायदा करुन मोदींनी मुस्लीम भगिनींना त्यांचा हक्क मिळवून दिला होता. आता यावर एक अग्रलेख लिहा असं आव्हान नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. संजय राऊत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर काही अग्रलेख लिहिणार नाहीत कारण अर्धा पगार बंद होईल असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -