Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीMonsoon : मान्सून लांबले, भाजीपाल्याचे दर भडकले!

Monsoon : मान्सून लांबले, भाजीपाल्याचे दर भडकले!

नवी मुंबई : जून महिना अर्धा सरला तरी पावसाने (Monsoon) ओढ दिल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी दोन महिन्यांपासून स्थिर असलेले भाजीपाल्याचे भाव आता वाढू लागले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. नजीकच्या काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

गेल्या काही दिवसांत मागणीपेक्षा आवक वाढल्याने भाज्यांचे भाव उतरले होते. त्यामुळे बऱ्याच भाज्या घाऊक बाजारात १० ते १२ रु. किलो दराने मिळत होत्या. एप्रिल, मे महिन्यात तर भाज्यांचे घाऊक दर निम्म्यावर आले होते. नागरिक मोठ्या संख्येने गावी, परगावी गेल्याने मुंबईत भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र आता मुंबईकर परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.

मात्र मागणी वाढलेली असतानाच पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

किरकोळ बाजारात आत्तापर्यंत २० रु. किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या ४० रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात ८ ते १० रु. किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता २२ ते २५ रु.पर्यंत पोहोचला आहे. तसेच कोथिंबिरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. दहा रुपये एक जुडी असा भाव असलेली कोथिंबीर आता ३० रुपयांवर पोहोचली आहे.

भाजी सध्याचे दर मागील किरकोळ दर

  • भेंडी : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ४० ते ५०
  • फरसबी: सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ४० ते ६०
  • गवार: सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ६०
  • घेवडा : सध्याचा दर :६० ते ८० मागील किरकोळ दर :५० ते ६०
  • कारली : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ५५
  • ढोबळी मिरची : सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ६० ते ६५
  • शेवगा शेंग : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०
  • सुरण : सध्याचा दर :८० ते ९० मागील किरकोळ दर : ६० ते ७०
  • मटार : सध्याचा दर :१०० ते ११० मागील किरकोळ दर : ६० ते ८०
  • हिरवी मिरची : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -