Monday, May 12, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीरायगडविडिओ

Gram Panchayat : महिलांची १० लाखांची पॉलिसी काढणारी राज्यातील 'ही' पहिली ग्रामपंचायत

Gram Panchayat : महिलांची १० लाखांची पॉलिसी काढणारी राज्यातील 'ही' पहिली ग्रामपंचायत

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राज्यासह केंद्र सरकार कटिबद्ध - चित्रा वाघ


पेण : ग्रूप ग्राम पंचायत (Gram Panchayat) वडखळ यांच्या वतीने ग्राम निधी मार्फत महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप अध्यक्षा चित्रा वाघ यांनी वडखळ ग्राम पंचायतीने महिलांसाठी घेतलेल्या या कार्यक्रमाची स्तुती करत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केंद्रासह राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.


यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, वडखळचे सरपंच राजेश मोकल, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंठे, जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष तन्वी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पुजा मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी १५ टक्के मागासवर्गीय निधी मधून साहित्य वाटप, ५ टक्के अपंग निधी अर्थसहाय्य वाटप, इंडिया पोस्ट पेमेंट बँक व टाटा एआयजी इन्श्युरन्स पॉलिसी वाटप, १० टक्के महिला बालकल्याण मधून हळदीकुंकू कार्यक्रम तसेच पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वडखळ सरपंचांनी अपंग, मागास, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या सोबत घेऊन चालण्याचे जे काम सुरू केले आहे त्याची स्तुती केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'बेटी बचाव बेटी पढाव' ची जी घोषणा केली आहे ती अमलात देखील आणली असल्याचे सांगितले.


त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे शिंदे फडणवीस सरकार महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध असतील याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.


सरपंच राजेश मोकल यांच्यावर कौतुकाची थाप टाकताना शासनाचा सेवक हा ग्रामसेवक असतो पण राजेश मोकल एवढे चांगले काम करत आहेत की तेच खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांचे सेवक झाले आहेत, असे त्या म्हणाल्या.



ग्राम पंचायत हद्दीतील सर्व महिलांची दहा लाखांची पॉलिसी काढणार


यावेळी आपल्या भाषणातून बोलताना सरपंच राजेश मोकल यांनी सांगितले की, आपण वर्षभरात ग्राम पंचायत माध्यमातून विशेषतः महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवत असतो. तसेच आतापर्यंत राबविलेल्या सर्वच योजनांचीही माहिती दिली. वडखळ ग्राम पंचायत ही राज्यातील अशी पहिली ग्राम पंचायत असेल की त्या ग्राम पंचायतीने ग्राम पंचायत हद्दीतील सर्व महिलांची दहा लाखांची पॉलिसी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment