मुंबई: बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने बिपरजॉय चक्रिवादळ बाधित भागातील गाड्या १८ जून पर्यंत रद्द केल्या आहेत. रेल्वे प्नशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण ९९ गाड्या रद्द केल्या आहेत. याआधी रेल्वेने ७६ गाड्या रद्द केल्या होत्या
याशिवाय तीन गाड्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यापूर्वी थांबवण्यात आल्या आहेत. इतर सात गाड्या त्यांच्या निश्चित स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून चालवल्या जाणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.