Tuesday, July 1, 2025

NEET Exam: नीट परिक्षा देताय? मग तुमचे वय काय? नॅशनल मेडिकल कमिशनने केला मोठा बदल!

NEET Exam: नीट परिक्षा देताय? मग तुमचे वय काय? नॅशनल मेडिकल कमिशनने केला मोठा बदल!

नवी दिल्ली: नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) नीट यूजी-२०२३ च्या परीक्षेचा निकाल (Neet UG-2023 Result) जाहीर झाल्यानंतर लगेच नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. वयाच्या जुन्या नियमांची सक्ती संपवून लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या नियमांनुसार ३१ जानेवारी २०२४ पर्यंत १७ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नीट यूजी-२०२४ परीक्षा देण्यासाठी पात्रता ठरवण्यात आले होते.  मात्र, आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत १७ वर्षे वय पूर्ण करणारे विद्यार्थी नीट यूजी-२०२४ परीक्षेला बसू शकतील. त्यामुळे आता नव्या नियमांतर्गत विद्यार्थ्यांना १७ वर्षे वय पूर्ण करण्याच्या जुन्या नियमांच्या हिशेबाने ११ महिन्यांची अतिरिक्त सूट मिळेल.


भारतामध्ये नीट यूजी परीक्षा देण्यासाठी दरवर्षी सरासरी २० लाख विद्यार्थी अर्ज करतात. याधीच्या नियमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे या परीक्षेला बसण्याचे स्वप्न भंगले होते.

Comments
Add Comment