आयपीएल गाजवणारे 'हे' दोन युवा खेळाडू आज एकमेकांना भिडणार! कारण....

पुणे: बहुप्रतिक्षित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2023) टी-२० क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या लढतीने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आज रात्री ८ वाजता हा सामना रंगणार आहे. तर सामन्यापूर्वी सायंकाळी ५.३० वाजता अमृता खानविलकरसह अनेक तारे-तारकांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे.


एमपीएलमध्ये सहा संघ १४ दिवस लढणार आहेत. १९ सामन्यानंतर एमपीएलचा विजेता मिळणार आहे. पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी लढत देणार आहेत. २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार असून दुपारी २ व रात्री ८ वाजता सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य मुक्त प्रवेश असून टेलिव्हिजनवरून दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरूनही हे सामने पाहता येणार आहेत.


दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव आमने सामने येणार असले तरी, अनुभवी नौशाद शेख व अंकित बावणेसह सचिन धस, साहिल औताडे असे युवा खेळाडू असलेल्या कोल्हापूर संघासमोर संतोष जेधे यांचे मार्गदर्शन लाभलल्या पुणे संघाचे आव्हान असणार आहे. पुणे संघात ऋतुराजसह यष्टिरक्षक सूरज शिंदे, पवन शाह, यश क्षीरगासर व अष्टपैलू रोहन दामले यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला