Saturday, July 20, 2024
Homeटॉप स्टोरीVande Bharat : 'यापेक्षा आमची एसटी बरी...' वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गळती?

Vande Bharat : ‘यापेक्षा आमची एसटी बरी…’ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गळती?

Vande Bharat : सोशल मीडीयावर मीम्सचा मुसळधार पाऊस

मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat) गळती झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीकेचा भडीमार सुरु केला असतानाच आता सोशल मीडीयावर मीम्सचाही मुसळधार पाऊस कोसळत आहे. ‘टिप टिप बरसा पानी…’, ‘यापेक्षा आमची एसटी बरी…’ अशा अनेक मीम्स द्वारे मोदी सरकारला ट्रोल केले जात आहे.

देशभरात सध्या १७ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. येत्या २६ जूनला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवासह आणखी ५ मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पण अशातच एका व्हायरल व्हिडीओमुळे पंतप्रधान मोदी आणि वंदे भारत एक्स्प्रेसला मोठ्या ट्रोलिंगला सामोर जावे लागत आहे.

काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका ट्रेनच्या बोगीमध्ये पाणी पडताना दिसत आहे. एक कामगार पडणाऱ्या पाण्याखाली प्लास्टिकचे ट्रे ठेवताना दिसत आहे. तर आतमध्ये प्रवासीही बसलेले दिसतात. केरळ काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ वंदे भारत एक्स्प्रेसमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ८ सेकंदाचा हा व्हिडीओ कोणत्या ट्रेनचा आणि कधीचा आहे, याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मात्र, काँग्रेसने या व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचे लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, व्हिडीओबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, दक्षिण रेल्वेने मात्र ट्विट करून हे आरोप फेटाळून लावले आहेत.

“केरळमध्ये सुरू असलेल्या वंदे भारतमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही. किंवा ही घटना दक्षिण रेल्वेमध्ये चालणाऱ्या इतर दोन वंदे भारत ट्रेन सेवांमध्ये घडलेली नाही,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वीही वंदे भारत ट्रेन अनेकदा वादात सापडली आहे. कधी जनावरे धडकल्याने ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. तर कधी दगड लागल्याने किंवा पक्षाची धडक बसल्याने काचा फुटल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. याशिवाय ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबतही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -